पुणे

कदम वाक् वस्ती येथिल दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, परीसरात हळहळ प्रतिनिधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर : कदमवाक् वस्ती येथिल दहावी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीने घरातील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी नगर परिसरात घडली असून गुरुवारी (ता.३१ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. रोशनी संतोष पसरडे (वय 17, गणेश कॉम्प्लेक्स, युनियन बँकेच्या जवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी पसरडे ही दहावी उत्तीर्ण झाली असून ती कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहत होती. तसेच रोशनीच्या मनाप्रमाणे तिचा विवाह ठरला होता. तसेच रितीरिवाजा प्रमाणे साखर पुडाही झाला होता. दरम्यान, रोशनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातील खोलीत साडीच्या सहाय्याने फॅनना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांनी दिली.’

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, यांच्या सूचने नुसार, पोलीसउपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलिस हवालदार राणी खामकर, केतन धेंडे, पोलिस अंमलदार रूपाली कदम व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रोशनी पसरडे हिला खाली उतरवून त्वरित लोणी काळभोर येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.दरम्यान, रोशनी पसरडे हिचे मनाप्रमाणे लग्न ठरले होते मग तिने आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, रोशनीचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याचे खरे कारण शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच पुढे येईल.