पुणे

“दाजीबा नादाला लावू नका” या व्हिडिओ गाण्याच्या पोस्टरचे श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भव्य अनावरण — मराठी कलाक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात “येडाई फिल्म प्रॉडक्शन” निर्मित दाजीबा नादाला लावू नका या व्हिडिओ गाण्याच्या पोस्टर अनावरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोस्टरचे अनावरण
श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलभाऊ रासने आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील फुगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू रामदास जगदाळे, हडपसर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रणनवरे व उपाध्यक्ष संजय भाडळे, तसेच दत्तात्रय दळवी, हडपसर कलाकार महासंघाचे अध्यक्ष प्रशांत बोगम, ज्येष्ठ अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे, भक्तिगीत गायक आप्पा पांचाळ, उद्योजक विजय मोरे, योगेश रासकर, बाळासाहेब केमकर, शंकर अक्कलकोटे, कुणाल निंबाळकर, महावीर रोटीचे विश्वस्त संदीप सुराणा, विनोद ताटीया, तसेच सार्थकी संतोष गाढवे, जय सुरेश शेंडे, अविनाश चव्हाण,  प्रियंका लाडे पाटील (पद्मिनी संगीत विद्यालय) आदी मान्यवर उपस्थित होते.

या व्हिडिओ गाण्याचे निर्माते आणि मुख्य अभिनेता नागनाथ गवसाने (अ.भा.म.चि. महामंडळ, भरारी पथक सदस्य) आहेत. गाण्याचे संगीतकार व दिग्दर्शक मोनु अजमेरी, सिनेमॅटोग्राफर सुरज इंगवले, संपादन हुजेप पुणेकर, नृत्यदिग्दर्शक सचिन घोरपडे, रंगभूषा व वेषभूषाकार जगदिश चव्हाण,
प्रॉडक्शन मॅनेजर विकास विजय यांनी सांभाळले. मुख्य कलावंतांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते नागनाथ गवसाने, अभिनेत्री अनुराधा रासकर, अपेक्षा ठोंबरे डान्स ग्रुप, पुणे यांचा सहभाग आहे. इव्हेंटचे आयोजन सौ. शर्मिला यादव (एस.पी. फाऊंडेशन, पुणे) यांनी केले. ध्वनी मुद्रण डी.जी. अँड होप स्टुडिओ मध्ये पार पडले.

‘दाजीबा नादाला लावू नका’ हे फक्त गाणं नाही, तर समाजातील सकारात्मक संदेश देणारं एक सांस्कृतिक आंदोलन आहे.
आमचा प्रयत्न आहे की, मराठी तरुणाईला चांगल्या विषयांद्वारे मनोरंजनासोबत विचार देणारे कलाविष्कार सादर करावेत.

निर्माते नागनाथ गवसाने

या कार्यक्रमामुळे मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.
पुणे शहरातील श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरातून झालेलं हे पोस्टर अनावरण
“येडाई फिल्म प्रॉडक्शन”च्या नव्या कलाकृतीला शुभारंभ देणारं ऐतिहासिक पाऊल ठरलं आहे.