Uncategorizedपुणे

राज्य मराठी पत्रकार परिषदेत वरिष्ठ राज्य कार्यकारिणी सदस्यपदी सुनिल थोरात यांची भक्कम नियुक्ती!

पुणे : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या केंद्रीय समितीअंतर्गत दैनिक नवराष्ट्रचे कदमवाकवस्ती (ता. हवेली, जि. पुणे) प्रतिनिधी सुनिल बबन थोरात यांची राज्य कार्यकारिणी सदस्य (वरिष्ठ) या अत्यंत प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती १ ऑक्टोबर २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत वैध राहणार असून ती संघटनेच्या नियम व अटींच्या अधीन राहील, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या दोन दशकांपासून राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश ही संघटना पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी ठामपणे लढा देत आहे. याचसोबत मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांना संघटनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, महिला पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी महिला मंच या स्वतंत्र शाखेची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे आणि केंद्रीय महासचिव पवन बैस यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल थोरात यांची निवड करण्यात आली असून, त्यांना पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि अहिल्यनगर विभागातील महिला मंचच्या नियुक्त्या व संघटनात्मक निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत.

थोरात यांना पत्रकारांच्या नियुक्तीबरोबरच महिला पत्रकारांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे, त्यांच्या कार्याला बळकटी देणे आणि राज्यभर संघटनात्मक उपक्रम राबविण्याची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्रीय महासचिव पवन बैस म्हणाले, “सुनिल थोरात यांनी गेल्या अनेक वर्षांत पत्रकार संघटनात्मक चळवळींमध्ये उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या अनुभवामुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल.”

राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष (प्रदेश) प्रविण शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय लोखंडे यांनी थोरात यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “सुनिल थोरात यांची नियुक्ती ही राज्य परिषदेच्या कार्याचा गौरव आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांना संघटनात्मक बळ आणि न्याय मिळेल.”

स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांकडून थोरात यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पत्रकार हितसंरक्षण चळवळीला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नियुक्तीपत्र केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे आणि केंद्रीय महासचिव पवन बैस यांनी पत्रकाद्वारे निवड केली.