पुणेमहाराष्ट्र

13 लाखांचे एम. डि. ( मॅफेडाॅन) ड्रग्स तस्करी प्रकरणी आरोपीस जामीन मंजुर

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे- कोंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक व कोंढवा पोलीस स्टेशन यांनी आरोपी सुनील बिष्णराम चौधरी ( वय 20 वर्ष रा- जोधपूर राजस्थान) येथील आरोपीस 13 लाख रुपये किमतीचे एम. डि. ( मॅफेडाॅन) ड्रग्स विक्रीसाठी आणल्याच्या आरोपातून दि.२/७/२०२५ रोजी ड्रग्स च्या साठ्या सोबत अटक केले होती. आरोपी हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडी मध्ये होता.

आरोपीच्या वतीने ॲड.आदेश चव्हाण, ॲड. धनंजय काळभोर व ॲड. सुलेमान शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जात पोलीस, सरकारी वकील, आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची ६० हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.