मुंबई, ता ११ : मुंबईतील मेट्रो, मोनोरेल पासून उड्डाणपुलापर्यंत, रस्त्यापासून उंच इमारतीपर्यंत घाम गाळून विकासाची निर्मिती करणारे लोक जाता-येता दिसतात; पण दिवाळीचा आनंद साजरा करताना असे समाजघटक विस्मृतीत जातात. निर्मितीचा आधार असलेल्या या श्रमिकांची दिवाळी गोड आणि प्रकाशमय करण्याच्या हेतुने ‘आरबीजी’ फाउंडेशनन् मुंबई ‘स्मार्ट’ ती गतीमान करणाऱ्या राबणाऱ्या कामगारांना दिवाळीची अनोखी भेट देऊन या मंडळींच्या चेहऱ्यांवर आनंद आणला.
विकासाचा पाया असलेल्या बांधकाम क्षेत्राकडून सार्वजनिक आणि खासगी कामे रात्रंदिवस सुरू असतात. या काँक्रिटी विकासात सिमेंट, विटा आणि रेतीसह हजारो श्रमिकांचा घामही मिसळलेला असतो. त्यातूनच सहा-आठपदरी रस्ते, उड्डाणपूल, इमारती आणि मेट्रोसारख्या सुविधांची निर्मिती महानगरांमध्ये होत असते. आपल्या मूळ गावापासून शेकडो मैल दूर येऊन हे कष्टकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन कंठत असतात.
पदराआड लेकराला झोपवून काम करणाऱ्या महिलेची, धुळीने माखलेल्या लहानग्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, या भावनेतून ‘आरबीजी फाऊंडेशनच्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांनी ही मोहीम हाती घेतील. तिच्या माध्यमातून शंभरपेक्षा अधिक कामगारांच्या कुटुंबांना साडी, ड्रेस, मिठाई देऊन, या कामगारांच्या घरीही दिवाळीच आणली. मुंबई शहर निर्माणात श्रमांचे मौल्यवान योगदान देणाऱ्या कष्टकर्यांची दिवाळी मधुरा गेठे यांच्या पुढाकाराने प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. या उपक्रमाबद्दल कष्टकर्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘आरबीजी फाउंडेशनचे आभार
मनापासून आभार मानले.
यावेळी मान्यवर उपस्थित होते.
कोण आहेत मधुरा गेठे?
नवी मुंबईतील आरबीजी’ फाऊंडेशनच्या चेअरमन म्हणून मधुरा राहुल गेठे काम करीत आहेत.आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विशेषत: महिलांचे आरोग्याच्या क्षेत्रात
मधुरा गेंठेचे काम आहे. राज्यातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मधुरा गेठे
यांचा पुढाकार आहे.
आपण मुंबईत राहतो, पण तिच्या उभारणीत झटणारे हात दुर्लक्षित राहू नयेत. या प्रत्येकाच्या अंगणी दिवाळी उत्सवाचा सुगंध असावा, कामगारांच्या छोट्या घरातही दिवाळीचा गोडवा यावा, या भावनेने कामगारांच्या कुटुंबियांसोबत अशा प्रकारे दिवाळी साजरी करून उत्सवाला सुरवात केली.
मधुरा राहुल गेठे
चेअरमन, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई