पुणेहडपसर

हडपसर येथे लवकरच महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत रुग्णालय उभारणार !

हडपसर येथे महापालिकेच्या माध्यमातून लवकरच अद्ययावत रुग्णालय उभारणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेच्या वतीने सर्व पक्षीय नवनिर्वाचित नगरसेवक मारुती आबा तुपे, नितीन गावडे, उज्ज्वला जंगले, पायल तुपे, हेमलता मगर, ॲड.अमोल कापरे, प्रशांत तुपे, अमित घुले, निवृत्ती बांदल, अतुल तरवडे, प्राची आल्हाट आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हडपसर येथील ब्राह्मण महासंघाच्या शाखेला कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली, त्यावर उपस्थित नगरसेविका, नगरसेवकांनी आपली मागणी लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र महिला आघाडीच्या केतकी कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, हडपसर संघाचे अध्यक्ष कपिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महिला आघाडीच्या केतकी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर संघाच्या कार्याचा आढावा मंदार रेडे सांगितला.

यावेळी सुमारे ६० ब्राह्मण व्यक्तींना संघाचे सदस्य नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
आभार संस्थेचे कपिल कुलकर्णी यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन श्रीकांत कुलकर्णी, अनिता काटे, अश्विनी औरसंग, अमृता मेढेकर, आकांक्षा देशपांडे आदींनी केले.