महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता “चौथी विकेट” जाणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे!आधीच धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला…
तर रुपाली चाकणकर यांनीही पद सोडलं. आता अडचणीत आहेत मंत्री नरहरी झिरवळ…
त्यांचा एक कथित खासगी व्हिडिओ समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात लावली आहे…
तर पक्षातही नाराजी वाढताना दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची भूमिका सकारात्मक असल्याची चर्चा…
पण अंतिम निर्णय असेल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा! दरम्यान, या प्रकरणात ब्लॅकमेलिंगचाही अँगल समोर येतोय…
आणि विजय वडेट्टीवार यांनीही मोठा दावा केला आहे.
जर झिरवळ यांनी राजीनामा दिला…
तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परत येणार का?
याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे!
