ठाण्यातील मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा बायपासजवळ एका किरकोळ वादातून हा प्रकार घडला. एका तरुणाने संतापाच्या भरात तब्बल पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
