पुणे

11 जणांचा मृत्यू! ओव्हरलोड गाडी ठरली मृत्यूचे कारण?

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात… आणि 11 जणांचा जागीच मृत्यू!
आज सकाळी रायते येथील नव्या पुलावर ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलींचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये प्रशांत चेदणे, भूषण घोरपडे, अनंता पवार, दीपक गवळी, नेहा मोहपे, मानसी मोहपे, प्रथमेश मोहपे, जिजागा केमबारी आणि गणपती मदे यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे 5+1 क्षमतेच्या गाडीत तब्बल 11 प्रवासी प्रवास करत होते!
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन केले आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत संताप व्यक्त केला आहे.