पुणेकरांनो… कल्पना करा…
एक हॉस्पिटल… आत आयसीयू… रुग्ण मृत्यूशी झुंज देतायत… आणि त्याच आयसीयूच्या बाजूला सापडतो… बॉम्ब!
हो… हडपसरमधल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेली ही घटना आता संपूर्ण पुण्याला हादरवून सोडतेय. सुरुवातीला “बॉम्बसदृश वस्तू” म्हणून पाहिलं गेलेलं प्रकरण आता अधिकृत तपासात “लो इंटेन्सिटी क्रूड बॉम्ब” असल्याचं स्पष्ट झालंय.
डॉक्टर रुग्णांची पाहणी करत होते… आणि आयसीयूजवळच्या टॉयलेटमध्ये लाईट सुरू दिसली. तपासायला गेले… तर वॉश बेसिनखाली एक बॉक्स.
त्या बॉक्सला वायर… टायमर… आणि पांढऱ्या नळकांड्या जोडलेल्या!
सर्वात धक्कादायक म्हणजे… त्या टायमरमधून टिक-टिक आवाज येत होता.
यानंतर जी गोष्ट घडली ती आणखी थरारक…
डॉक्टरांनी तो बॉम्ब स्वतः उचलून हॉस्पिटलच्या बाहेर नेला!
हो… पोलिसांनी हात लावू नका सांगूनही बॉक्स हलवण्यात आला.
आता प्रश्न असा — एवढा मोठा धोका का पत्करला गेला?
तपासात समोर आलंय की या बॉम्बमध्ये तीन जिलेटीन कांड्या, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि टायमर होता. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट मध्यरात्री होण्यासाठी सेट करण्यात आला होता.
दरम्यान सीसीटीव्हीत एक संशयित ई-स्कूटरवर बॉक्स घेऊन येताना दिसलाय. दुसरा संशयित चेहऱ्यावर रुमाल बांधून वारंवार हॉस्पिटल परिसरात फिरताना दिसतोय.
आतापर्यंत १७ ते १८ जणांची चौकशी झालीये… आणि आता ATS देखील तपासात उतरलंय.
पण या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आहे…
स्थानिक सूत्रांनुसार डॉक्टर आणि शेजारच्या सोसायटीमध्ये जुने वाद होते. त्यामुळे हा वैयक्तिक राग होता? की हॉस्पिटलला टार्गेट करण्याचा मोठा कट?
सध्या पुणे पोलिस आणि ATS दोघेही प्रत्येक अँगलने तपास करतायत.
पण एक गोष्ट नक्की…
जर हा बॉम्ब वेळेत सापडला नसता… तर पुण्यात मोठी दुर्घटना घडू शकली असती!
हॉस्पिटलमध्ये सापडला खरा बॉम्ब? ATS तपासात धक्कादायक खुलासे
