पुणे

कोलाडच्या पाड्यातून UK विद्यापीठात प्रवेश! सपना वाघमारेची प्रेरणादायी कहाणी

रायगडच्या दुर्गम पाड्यात वाढलेली एक मुलगी…
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…
पालक मोलमजुरी करून शिक्षण देत होते…
आणि आज तीच मुलगी थेट युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षणासाठी झेप घेत आहे!
ही प्रेरणादायी कहाणी आहे सपना राजेश वाघमारे हिची.
हडपसरमधील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या सपनाने कायद्याची पदवी पूर्ण केली…
आणि आता LLM शिक्षणासाठी तिला UK मधील जगप्रसिद्ध
University of Leeds
आणि
Queen Mary University of London
या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालाय!
सपना ही कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थिनी असून, अत्यंत कठीण परिस्थितीतून तिने हे यश मिळवलं आहे.
ती सांगते…
आदिवासी विकास विभागाच्या “ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्राम”, वसतिगृह प्रशासन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे स्वप्न पूर्ण झालं.
आज सपनाचं यश फक्त तिच्या कुटुंबासाठी नाही…
तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणा ठरत आहे.
कारण परिस्थिती गरीब असली…
तरी स्वप्नं मोठी असू शकतात…
आणि जिद्द असेल… तर पाड्यातूनही थेट सातासमुद्रापार भरारी घेता येते!