AI टेक्नॉलॉजीमुळे देवगड हापूसला नवी ओळख; राहुल शेवाळे यांनी कृषिमंत्र्यांना दिली खास भेट

Rokhthok Maharashtra 13 0

कोकणातील देवगड हापूस आंब्याला आता एआय टेक्नॉलॉजीची जोड मिळत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादनात नवे प्रयोग होताना दिसत आहेत.
पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री Shivraj Singh Chouhan यांची भेट घेत त्यांना देवगड हापूस आंब्याची पेटी भेट दिली. यावेळी त्यांनी कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या देखील मांडल्या.

राहुल शेवाळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोकणावरील प्रेमातून देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी केली. बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनिंग मशीनसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. सध्या या मशीनची किंमत तब्बल ४० ते ५० लाख रुपये असल्याने सामान्य शेतकऱ्यांना ती परवडत नाही.
तसेच देवगड हापूसमध्ये वाढत चाललेल्या ‘साका’ समस्येवर सखोल संशोधन व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल शेवाळे यांना दिल्लीमध्ये चर्चेसाठी निमंत्रित करत सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.