धुळे जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आलीय… शनी अमावस्येची पूजा करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा एका भोंदूबाबाने निर्घृण खून केल्याचं उघड झालंय.
जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे हे दोघे नोकरीत स्थिरता आणि कौटुंबिक सुखासाठी भोंदू योगेश खैरनारकडे गेले होते. पूजा संपल्यानंतर योगेश जयश्रीला घरी सोडायला निघाला… पण रस्त्यातच त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
जयश्रीने विरोध करताच संतापलेल्या भोंदूने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला… आणि अपघात वाटावा म्हणून दुचाकी तिच्या अंगावर टाकली.
यानंतर अक्षयने उशीराबाबत विचारणा केली… त्यातून वाद झाला आणि योगेशने लोखंडी वस्तूने त्याच्या डोक्यात वार करून त्यालाही संपवलं. इतकंच नाही… मृतदेह डोंगरावर नेऊन पुरल्याची कबुलीही आरोपीने दिलीय.
या प्रकरणात आता जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धुळ्यात दुहेरी हत्याकांड! पूजेनंतर भोंदूबाबाने रचला मृत्यूचा खेळ
