हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
हडपसर व परिसरातील रस्त्यांची वाहतूक कोंडी म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे, या गंभीर प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रभागातील पर्यायी रस्ते सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे या रस्त्यामुळे हडपसर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होणार आहे असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
हडपसरवरून ससाणेनगर, सय्यदनगर, महम्मदवाडी, हांडेवाडी, उंडरी या परिसरात नागरिक, वाहनचालक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात सय्यदनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर कायम गर्दी असते त्यामुळे वाहनचालकांना या गर्दीचा फटका बसतो नगरसेवक भानगिरे यांनी हांडेवाडी रस्ता रुंदीकरण करण्याबरोबर डांबरीकरण केले येथे फुटपाथही केले रस्त्यावर असणाऱ्या भाजी मंडईचे स्थलांतर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशस्त ठिकाणी झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली.
हांडेवाडी रस्ता रुंदीकरणासाठी 2 कोटी रुपये निधी व चालू अर्थसंकल्पात 1 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. येथील श्रीराम चौक सुशोभिकरण करून रस्ते रुंद फुटपाथ केले, चौक सुशोभीकरण करण्यास प्रमोदनाना भानगिरे यांनी सुमारे 75 लाख रुपये खर्च केला व या निधीतून अतिशय देखणा चौक केला आहे.
श्रीराम चौकातून काळेपडळ कडे जाणारा पर्यायी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाल्याने सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंगचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे तसेच या ठिकाणी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आमदार व खासदार यांची मदत घेऊन सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंग च्या दोन्ही बाजूला दोन भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे या भुयारी मार्गामुळे रेल्वे क्रॉसिंगचा ताण कमी होणार आहे. नगरसेवक म्हणून काम करत असताना नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही प्रभागातील येणारे व जाणारे पर्यायी रस्ते सक्षम करण्यावर भर दिला आहे त्यासाठी आम्ही राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकास करण्यावर भर दिला असल्याची माहिती नगरसेवक नाना भानगिरे यांनी बोलताना दिली नगरसेवक भानगिरे यांनी चौक सुशोभीकरण बरोबर पर्यायी रस्ते सक्षम करण्यासाठी पावले उचलल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होणार आहे.
