पुणे

ब्रेकींग न्युज…. राहुल शेवाळे करणार राष्ट्रवादीला राम-राम… निवडणुकीच्या धामधुमीत लवकरच भाजप प्रवेश….

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत युवक नेता भाजपमध्ये जाणार असल्याने पुरंदर हवेली तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील ५ आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली, त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला पुरंदर-हवेली मतदार संघात फटका बसणार असून शेवाळेवाडीचे सुपुत्र असलेले राहुल शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा फळीतील नेते होते, शरद पवार, अजितदादा पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता, विविध कार्यक्रम राबवून त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पुणे जिल्ह्यात बांधणी केली होती, त्यांच्यासमवेत त्यांना मानणारा मोठा युवा कार्यकर्त्यांचा संच हा भाजपात जाण्याची शक्यता असल्यानं पुणे ग्रामीण भागात याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो.
माजी आमदार जगगनाथ शेवाळे व पुतण्या राहुल शेवाळे यांच्यात राजकीय वितुष्ट होते, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळचेपी होत असल्याची भावना राहुल शेवाळे यांच्या मनात निर्माण झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून फारकत घेण्यास सुरुवात केली होती, दौंडचे रासपचे एकमेव आमदार राहुल कुल भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, शेवाळे राहुल कुल यांचे निकटवर्तीय समजले जातात, राष्ट्रवादीने शेवाळे यांना जिल्हा युवक अध्यक्ष पदाची संधी दिली होती काही दिवसांपासून नाराज असलेल्या राहुल शेवाळे यांची भाजपशी जवळीक वाढत चालली आहे.

0 0 votes
Article Rating
95 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
farhanjani jani
4 months ago

Designing machine systems that reduce manual labor requirements and improve workplace efficiency across all levels of production. maquina de limpieza por ultrasonidos