पुणे शहरात मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विरोधात बदनामीकारक बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
या प्रकरणी पुणे शहर काँग्रेसने आता थेट पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेत लेखी निवेदन दिलं.
काँग्रेसचा आरोप आहे की, काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक शहरातील विविध चौकांमध्ये हे बॅनर्स लावून काँग्रेस पक्ष आणि सतेज पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे हे सर्व भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असल्याने पोलिसांनी फुटेज तपासून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधितांवर बदनामी, शहर विद्रूपीकरण, राष्ट्रीय पक्षाच्या नावाचा गैरवापर आणि दंगलसदृश्य वातावरण निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.
यावेळी प्रशांत जगताप, दीप्तीताई चवधरी, मोहनदादा जोशी, गोपाळदादा तिवारी, चंदूशेठ कदम, सुनील शिंदे आणि भाऊसाहेब आजबे उपस्थित होते.
बंटी पाटीलांविरोधातील बॅनर्सवरून काँग्रेस आक्रमक; पोलिसांकडे कारवाईची मागणी
