आंदेकर टोळी अहिल्यानगरमध्ये जेरबंद; दरोड्याचा मोठा कट उधळला!

Rokhthok Maharashtra 17 0

पुण्यात दहशत माजवणारी कुख्यात ‘कोयता गँग’ आता अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील पाच जणांना जेरबंद केलं आहे.
मिरावली पहाडाजवळ काही संशयित इसम शस्त्रांसह थांबल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजेन्सकडून पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली.
या कारवाईत मुस्ताक शेख, विराट उर्फ विल्यम मेहंदळे, समर्थ माडळकर आणि समर्थ दुधभाते यांना अटक करण्यात आली.
तर आकाश पवार हा सुरुवातीला पळून गेला होता. मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्यालाही पकडलं.
आरोपींकडून चार गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुसे, चाकू, मोबाईल असा तब्बल दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे सर्व आरोपी पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोंढवा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही टोळी नेमका कुठे आणि कोणावर दरोडा टाकणार होती?
याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.