युजर्स चार्जेसचा नवा फटका! डाळी, साखर, तेल महागणार? व्यापारी-ग्राहक संतप्त

Rokhthok Maharashtra 15 0

कृषी उत्पन्न बाजार समितीने अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर एक टक्का युजर्स चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला व्यापारी आणि ग्राहक वर्गातून तीव्र विरोध होत आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अतिरिक्त शुल्कामुळे डाळी, साखर, खाद्यतेल, पीठ, रवा, मैदा यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना हा नवा आर्थिक बोजा ग्राहकांच्या खिशावर आणखी भार टाकणार आहे.
व्यापारी संघटनांनी सांगितले की, जीएसटी, सेस आणि आता युजर्स चार्जेसमुळे व्यापार करणे कठीण होत चालले आहे. हा निर्णय कायम राहिला तर अनेक व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्याचा परिणाम हजारो कामगारांच्या रोजगारावरही होणार आहे.
ग्राहकांनीही सरकारवर नाराजी व्यक्त करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. महागाईपासून दिलासा देण्याऐवजी सरकार सामान्य नागरिकांवर आर्थिक संकट लादत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.