परभणी हादरलं! उद्योजकाच्या कारवर अज्ञातांचा हल्ला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचाव.

Rokhthok Maharashtra 95 0

परभणी शहरातील प्रसिद्ध उद्योजक लखन गोपालदास अग्रवाल यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शुक्रवारी पहाटे मानवत रोडवरील सेतूजवळ मुंबईकडे जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर अचानक दगडफेक केली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले.
प्रसंगावधान राखत चालकाने गाडी न थांबवता वेगाने पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर काही अंतरापर्यंत एका क्रूझर वाहनाने त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात लखन अग्रवाल यांनी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप केवळ घटनेची नोंद झाल्याचे सांगितले जात असून, अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत पोलिसांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.