पंढरपूर वारीचं आमिष… अनैतिक संबंधातून महिला सरपंचांचा खून! मृतदेह समुद्रात टाकण्याचा कट फसला

Rokhthok Maharashtra 9 0

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिरगावच्या महिला सरपंचांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचा आरोप असून, मृतदेह मुंबईच्या समुद्रात टाकण्याचा कटही पोलिसांनी उधळून लावला आहे.
व्हॉइस ओव्हर:
शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांची त्यांच्या कथित प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
आरोपीने सुरेखा न्यारे यांना “पंढरपूरला जाऊया” असे सांगून गावाबाहेरील जनावरांच्या शेडमध्ये नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
यानंतर मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा कट आरोपीने रचला. मात्र, त्याने ही माहिती आपल्या भाच्याला दिल्यानंतर भाच्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांना खबर मिळाली आणि आरोपी नारपोली पोलिसांच्या ताब्यात आला.
या घटनेमुळे शिरगावसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.