मित्राला सोडवण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात घुसला तरुण!

Rokhthok Maharashtra 8 0

पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोयत्याने प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणातील एका आरोपीची चौकशी सुरू असताना त्याचा मित्र विनायक दत्तात्रय भोंडवे (वय २४) थेट पोलीस ठाण्यात घुसला.

https://youtube.com/shorts/DzQdnV4ZSGk

पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने तपास पथकाच्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न करत, “माझ्या मित्राला तात्काळ सोडा, नाहीतर पोलीस ठाणे पेटवून देईन,” अशी धमकी दिली. यानंतर त्याने पोलिसांना शिवीगाळ केली आणि खोलीच्या दारावर लाथा मारत गोंधळ घातला.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी विनायक भोंडवेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी देणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.