*मोदींचा बारामती दौरा! ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार?*

Rokhthok Maharashtra 9 0

*पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा; ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार?*

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या *१६ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता* असून, त्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या स्मृती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या *‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन* होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.
बारामतीमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य डोमला *‘प्रेरणास्थळ’* असे नाव देण्यात आले आहे. भगवान गौतम बुद्धांचे विचार, शांतता, समता आणि मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे स्थळ उभारण्यात आले आहे.
शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत आपले बोलणे झाले आहे.* १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधानांच्या उपलब्ध वेळेनुसार उद्घाटनाची तारीख निश्चित होणार आहे.
मात्र, *१६ ऑक्टोबरला मोदी बारामतीत येण्याची शक्यता* असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भगवान गौतम बुद्धांचा शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारे हे ‘प्रेरणास्थळ’ बारामतीच्या सांस्कृतिक वैभवात महत्त्वाची भर घालणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.