कन्नडच्या युवकाची आदिवासी विकास विभागात शिक्षकपदी निवड!
कन्नड परिसरातील एका युवकाची आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक पदावर निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित युवक यापूर्वी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात कामाला होते. तसेच यापूर्वीही त्यांना विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
सततच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा सरकारी सेवेत स्थान मिळवत शिक्षकपदाची निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कन्नड | छत्रपती संभाजीनगर
प्रतिनिधी : समर्थ जाधव





