कन्नडच्या दादासाहेब गायकवाड यांची आदिवासी विकास विभागात शिक्षकपदी निवड !

Rokhthok Maharashtra 50 0

कन्नड | छत्रपती संभाजीनगर

✍️ प्रतिनिधी : समर्थ जाधव

कन्नड : कन्नड तालुक्यातील दादासाहेब गायकवाड यांची आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक पदावर निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या यशामुळे कन्नड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दादासाहेब गायकवाड यांनी यापूर्वी कन्नड ग्रामीण रुग्णालयात काम केले आहे. तसेच विविध सरकारी सेवांमध्ये काम करण्याचा अनुभवही त्यांना मिळाला आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा सरकारी सेवेत स्थान मिळवत शिक्षकपदाची निवड मिळवली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, क्ष-किरण अधिकारी श्री. मोहिते, अधीपरिचारिका श्रीमती वसावे, कार्यालयीन अधीक्षक श्री. काळे तसेच ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी यांनी दादासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दादासाहेब गायकवाड यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.