पुणे

राहुल शेवाळे यांचे आरोप महिला लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे घाणेरडे षड्यंत्र, कायदेशीर कारवाई करणार : सुप्रिया सुळे यांचा इशारा

 

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)-

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्‍लिपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्षाला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्‍लिप समोर आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून सुळे यांनी फोनवरून घरात घुसून मारण्याची भाषा वापरल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांचे आरोप फेटाळले असून धमकी दिली होती तर शेवाळे यांनी पोलिसांकडे तक्रार न करता मतदान 3 दिवसांवर आले असताना प्रसारमाध्यमांकडे का धाव घेतली असा सवाल करत आपण याबाबत कायदेशीर कारवाई शेवाळे यांच्यावर करणार असल्याचे जाहीर केले.शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुप्रिया सुळे यांनी फोनवर वापरलेल्या भाषेमुळे मोठा वाद निर्माण झाला असून सुप्रिया सुळे यांनी धमकी दिल्याचा आरोप करीत राहुल शेवाळे या ऑडिओ क्‍लिपसह पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑडिओ क्‍लिपमधील व्हायरल झालेले संभाषण …!

सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे : हॅलो.

सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे : नाही.

सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे की, पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून…

राहुल शेवाळे : हां… नाही नाही…

सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?

राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.

सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा… तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोलतेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?

राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हणलं तुम्हाला मी.

सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय हे ठीक आहे; पण एक लक्षात ठेवा. राहुल शेवाळे, सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. आय एम सीरिअस. माझी बदनामी केली ना, तर अबू्रनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. कारण मी खरी बाई आहे. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.

राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.

सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.
ही क्‍लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून मतदान जवळ आले असताना ही क्लिप व्हायरल झाल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

0 0 votes
Article Rating
235 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments