30 वर्षांत 100+ वाहनचोरी! 60 वर्षीय आरोपी जेरबंद

Rokhthok Maharashtra 6 0

वाहनचोरीच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या 60 वर्षीय आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांत त्याच्याविरुद्ध 100 हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजू बाबुराव जावळकर असून, तो डोणजे फाटा, पुणे येथील रहिवासी आहे.
पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2 कडून विशेष मोहीम राबवली जात होती. याचदरम्यान 8 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना जावळकर डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिला यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने डोणजे परिसरात कारवाई करत राजू जावळकरला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यात तो पाहिजे होता. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
जावळकरविरुद्ध पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगर आणि इतर भागांत 100 पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त गौहर हसन आणि सहा. पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सपोनि स्वप्नील लोंखडे, मपोउप तेजश्री पवार तसेच शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदिप शिर्के, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विदया शिंदे आणि विनायक यांच्या पथकाने केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.