भरतशेठ गोगावले यांची केशवनगरातील गणेश मंडळांना भेट; संदीपदादा लोणकर यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची आरती

Rokhthok Maharashtra 8 0

केशवनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते तथा केशवनगरचे माजी सरपंच संदीपदादा लोणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रीगणेशाची आरती केली.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, महादेव दंदी, अमर घुले, पंकजभाऊ कोद्रे, दीपक कुलाल, अक्षय तारू, अजय जाधव, अमोल घाडगे, छायाताई गदादे, संतोष शिंदे, नंदाताई जाधव, निशिगंधाताई थोरात, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्यातील दुष्काळ दूर व्हावा, बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा, अशी श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.