ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; दोन संशयित अटकेत!

Rokhthok Maharashtra 6 0

ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन प्रमुख संशयितांना ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे.
संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह उर्फ पपलू अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता अटक आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपींनी मोबाइल बंद करून महाराष्ट्रातून पलायन केलं होतं. ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने त्यांचा शोध घेतला.
दरम्यान, या हत्येमागे मोठा कट होता का आणि पाच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे. मात्र, सुपारीच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या हत्येचा सूत्रधार कोण आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.