अनधिकृत बांधकामांना सरकारचा दणका! दस्त नोंदणीवर निर्बंध

Rokhthok Maharashtra 12 0

महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकामांबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या सदनिका आणि मंजूर आराखड्यापेक्षा अधिक बांधकाम झालेल्या इमारतींमधील सदनिकांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नव्या निर्देशांनुसार, अशा सदनिकांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांच्या नोंदणीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या विक्रीचे करार, खरेदी-विक्री दस्तऐवज, अपार्टमेंट डीड आणि हस्तांतरण दस्तऐवजांचा समावेश आहे.
अनधिकृत बांधकामांना आळा घालणे, मालमत्तेच्या व्यवहारांमधील फसवणूक रोखणे आणि घर खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर नियंत्रण येणार का? तसेच घर खरेदी करताना नागरिकांना कितपत संरक्षण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.