रात्री 9 वाजता धमकी, 11 वाजता मर्डर! संभाजीनगरात तौसिफची हत्या; आरोपी बीडमधून अटकेत

Rokhthok Maharashtra 10 0

रात्री ९ वाजता धमकी, अन् ११ वाजता हत्या! संभाजीनगरात बहिणीशी बोलण्याच्या संशयातून तरुणाचा खून!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका क्षुल्लक वादातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तौसिफ शमीम शेख असं मृत तरुणाचं नाव असून, आदित्य शेळके असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तौसिफ हा आरोपीच्या मावस बहिणीशी बोलत असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रात्री नऊच्या सुमारास आरोपीने तौसिफला ‘मी तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याची माहिती आहे.
यानंतर अवघ्या दोन तासांत, म्हणजेच रात्री अकराच्या सुमारास, तौसिफ घराजवळ मोटरसायकलवर बसलेला असताना आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तौसिफला रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी बीडमधून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
एका संशयातून तरुणाचा जीव गेला! रागाच्या भरात कायदा हातात घेण्याची ही वृत्ती समाजासाठी चिंतेचा विषय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा रोखठोक महाराष्ट्र न्यूज!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.