१ लाख पगार, तरी वीकेंडला रॅपिडो चालवतात! पुण्यातील २ इंजिनिअर्सची कहाणी व्हायरल
महिन्याला १ लाख पगार, तरीही वीकेंडला रॅपिडो चालवतात! पुण्यातील दोन इंजिनिअर्सची कहाणी व्हायरल!
महिन्याला लाखभर रुपये पगार… हातात स्पोर्ट्स बाईक… आणि वीकेंडला चक्क रॅपिडो रायडर! पुण्यातील दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची ही भन्नाट कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांचे वार्षिक पॅकेज १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून त्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी चालवण्याचा अनुभव घेतला. काही तासांच्या राईड्समधून एकाने ९०० रुपये, तर दुसऱ्याने ५०० रुपये कमावल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
पण लाखोंचा पगार असताना हे तरुण रॅपिडो का चालवत आहेत?
त्यामागे केवळ पैसे कमावण्याचा उद्देश नसून, नेहमीच्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं करून पाहण्याची उत्सुकता असल्याचं पोस्टमधून सूचित होतं.
या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या कल्पनेचं कौतुक करत आहेत, तर काहींना हा अनुभव स्वतः घ्यायचा आहे.
नोकरीचा ताण, वीकेंडची मजा आणि काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा! पुण्यातील या दोन इंजिनिअर्सची कहाणी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
तुम्ही असं काही करून पाहाल का? कमेंट करून नक्की सांगा!
पाहत राहा, रोखठोक महाराष्ट्र न्यूज!





