संजय गायकवाडांवर निलंबनाची कारवाई होणार? एकनाथ शिंदे संतप्त; शिंदेसेनेत खळबळ

Rokhthok Maharashtra 9 0

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आता पक्षश्रेष्ठींच्या रडारवर आले आहेत.
आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते.
विशेष म्हणजे, शिंदे यांच्या शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मोहीम राबवली जात आहे. शेतकरी कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन, मुलींना सायकली आणि दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचे वाटप केले जात असल्याचा पक्षाचा दावा आहे.
अशा परिस्थितीत संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना पक्षातील काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, संजय गायकवाड यांचे निलंबन प्रत्यक्षात होणार का? पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होणार? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.