पुणे

सराईत गुन्हेगारास घेतले ताब्यात ; गुन्हेगाराकडून ३८ मोबाईल व दोन मोटार सायकली जप्त : वानवडी पोलीसांची कारवाई

पुणे– (अनिल मोरे -रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
सराईत गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले, तपासात 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना वानवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील म्हणाले,
वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे कर्मचारी पोलिस शिपायइ नवनाथ खताळ, व नासीर देशमुख यांना दि. २३ जुलै रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली, एक ग्रे रंगाची पल्सर २२० मोटार सायकल असुन ती चोरीची असल्याचा संशय आहे. अशी बातमी मिळाल्याने तात्काळ त्या ठिकाणी जावुन त्यांनी बजाज पल्सर २२० क्रमांक MH-12/GY/150 ताब्यात घेवुन, त्या व्यक्तीस  त्याचे नाव पत्ता विचारता अजय रणछोड उर्फ राजु खरे वय २० वर्षे रा.काळेपड रेल्वे गेट जवळ म्हसोबा मंदीरा शेजारी गल्ली नंबर १ हडपसर पुणे मुळ गाव मु.पो. ओझर ता.गंगापुर जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले असुन त्यास मोटार सायकलबाबत अधिक विचारणा केली असता त्याने सदरची मोटारसायकल त्याचा साथीदार साहोल इनामदार रा.आदर्शनगर जे.एस. पी. एम. कॉलेजच्या मागे याच्या सोबत चोरी केल्याचे कबुल केले. ही माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. याबाबत वानवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याचेकडुन एकुण ३८ मोबाईल व दोन मोटार सायकल असा एकुण ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, सुनिल फुलारी, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ सुहास बावचे, पोलीस आयुक्त सुनिल देशमुख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक रमेश भोसले, पोलिस हवालदार राजु सासगे, पोलिस नाईक योगेश गायकवाड, संभाजी दिवेकर, सुधीर सोनवणे, प्रतिक लाहिगुडे, महेश कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

0 0 votes
Article Rating
106 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments