पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
( १५ ऑगस्ट ) मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. त्यावेळी लहान विद्यार्थांनी मार्च पास करून तसेच ज्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी लढले व अमर झाले त्यांना एक श्रद्धांजली देण्याचा प्रयन्त केला. तसेच देशावरील गाणी , व नृत्य ,कला, सादर केल्या याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिरीष कुमार गांधी (DYSP) सोलापूर ग्रामीण आणि संजना गांधी उपस्थित राहिले. त्यांनीही आपल्या भाषणामध्ये मुलांना देशविषयी तसेच एक नागरिक म्हणून आपण काय केले पाहिजे . भारत आपले मातृभूमी आहे आणि आम्ही त्याचे नागरिक आहोत आपण नेहमीच वाईट लोकांपासून तिला वाचविण्यासाठी तयार राहावे आपल्या देशाला पुढे नेणे आणि जगातील सर्वोत्तम देश बनविणे हि आपली जबाबतदारी आहे . हे समजून सांगितले. तसेच स्वच्छ भारत याचाही नारा दिला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले वडकी गावातील सरपंच , ग्रामस्थ , पालकवर्ग , यांनीही मोट्या संख्येने उपस्थिती लावली. याप्रसंगी संजय मोडक एज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष श्री. संजय मोडक व सचिव :- मनीषा मोडक, संचालक मंडळ , साधना कटके , रुपाली मोडक , तुषार मोडक , माऊली मोडक , करिष्मा मोडक , प्रणाली मोडक , उपस्थित होते. स्कूलचे प्राचार्य सृतिरंजन बारीक सर ,यांनीही विद्यार्थाना योग्य मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक वर्ग , आदी उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन करून मुलांना खाऊ वाटप केला.
लोककल्याण प्रतिष्ठान च्या वतीने स्वतंत्र हिन्दूस्तान चा ७३वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते नितिन होले यांच्या शुभहस्ते झेंडा वंदन करण्यात आले.प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली.याप्रसंगी प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष हरिश्चंद कुळकर्णी,सचिव विनोद सातव,खजिनदार प्रदीप जगताप, प्रभाकर शिंदे,चंद्रकांत वाघमारे,प्रवीण होले,तुकाराम घोडके,आशा शिंदे,छाया दरगुडे, तुकाई दर्शन अगंणवाडी शिक्षिका वैशाली होले ,मदतनिस संगीता देडगे आदिंसह बहुसंख्येने विद्यार्थि,नागरिक उपस्थित होते.
साथना विद्यालयात गुरूकुल प्रकल्पा अंतर्गत बाह्य व्याख्यानाचे आयोजन.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.अभंग ए.डी.यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.श्री.शिवदास पी.व्ही.यांनी व्यावसाय मार्गदर्शक व समुपदेशन याविषयी माहिती दिली.भविष्यातील करीअर व विविध संधी यांची निवड कशी करावी.याबाबत उदाहरणांसह माहिती दिली.आपणाकडे असणारे कौशल्य व आपली आवड यांची योग्य सांगड घालून शाखा निवडावी.कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा पुढे भविष्यात काय करणार आहात यानुसार निवड करा.तुम्हाला आवडणार्या क्षेत्राची निवड करावी.त्यामथ्येच चांगले करिअर करता येईल.जीवनात कठीण परीश्रम केले तर तुम्ही निश्चिंत यशस्वी व्हाल. मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री.कुलकर्णी एस.बी.पर्यवेक्षक श्री.मोहीते एस.आर.ऊपस्थित होते.प्रास्ताविक श्री.आवळे बी.बी सुत्रसंचलन सौ.सावंतताई व आभार सौ.उरमोडे ए. आर. यांनी मानले.
