“मोडक इंटरनॅशनल स्कुल” मध्ये स्नेहसंमेलनात मुलांकडून कलेचे सादरीकरण

Rokhthok Maharashtra 31 0

वडकी :- (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन) “मोडक इंटरनॅशनल स्कुल” मध्ये ४ थे वार्षिक  स्नेहसंमेलन घेण्यात आले स्नेहसंमेलनाचा विषय “भारतीय संस्कृती आणि सभ्यता” या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
 कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी संजय मोडक तर प्रमुख पाहुणेम्हणून पुणे उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड
 यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य 
सृतिरंजन बारीक यांनी केले. गणेश वंदना करून
 कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून दाद मिळवली. ग्रामीण जीवन व शहरी जीवन अशा दोन्ही गोष्टी यावेळी दाखविण्यात आल्या.
 नृत्य, गायन  व नाटक यांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले, 
तसेच पालक वर्ग व  गावातील ग्रामस्थांनी मोठ्या
 प्रमाणात येऊन मुलांना दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संचालक, शिक्षक वृंद, आदी 
उपस्थित होते.

Facebook Page Link

https://m.facebook.com/story.php?story_fbid=116274363209994&id=112080646962699

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.