पुणे

बार्टी संस्थेच्या वतीने आद्य क्रांतीवीर लहूजी (वस्ताद) साळवे यांना अभिवादन…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे:दिनांक 17 फेब्रुवारी रोजी ( बार्टी )
“डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेच्या” वतीने संस्थेचे महासंचालक मा.धम्मज्योती गजभिये यांच्या मागर्दर्शनाखाली समतादूत विभागामार्फत आद्य क्रांतीवीर लहूजी (वस्ताद) साळवे याच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाद्धारे अभिवादन करण्यात आले.

बार्टी पुणे मुख्यालयात आद्य क्रांतीगुरु लहूजी (वस्ताद) साळवे यांच्या प्रतिमेस विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, डॉ.सत्येद्रनाथ चव्हाण,मा. रविद्र कदम, निबंधक श्रीमती इदिरा अस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, विभागप्रमुख डॉ. सत्येद्रनाथ चव्हाण , प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवते, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ संभाजी बिराजे , डॉ अंकुश गायकवाड यांनी लहूजी साळवे याच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून त्याच्या कार्याला उजाळा दिला, यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुभेदार सचिन जगदाळे, रितेश गोडाने, लेखाधिकारी राजेद्र बरकडे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.सारिका थोरात, शुभागी सुतार, महेश गवई, नरेश गोटे, रविकुमार आराक, विशाल शेवाळे आणि बार्टी मधील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

संगमवाडी पुणे येथील लहूजी (वस्ताद) साळवे यांच्या समाधीस्थळी ही बार्टी कडून अभिवादन करण्यात आले,
संगमवाडी पुणे येथील समाधीस्थळी, बार्टी संस्थेच्या वतीने विभागप्रमुख डॉ. सत्येद्रनाथ चव्हाण श्रीमती स्नेहल भोसले, निबंधक श्रीमती इदिरा अस्वार, यांनी अभिवादन केले, समाधीस्थळी बार्टी संस्थेच्या वतीने शाहू ,फुले,आंबेडकर यांचे मौल्यवान विचार असणारी पुस्तक विक्री स्टॅाल व विविध योजनाची माहिती स्टॅाल आलेल्या अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

आद्य क्रांतीगुरु लहूजी (वस्ताद) साळवे तालीम व स्मारक रामोशी गेट पुणे येथील स्मारकाची सजावट बार्टी संस्थेच्या वतीने करण्यात आली, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेऊन अनेक योजना सुरु केल्याबद्दल लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे व दत्ता जाधव यांनी मांतग समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानले, यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुभेदार सचिन जगदाळे, रितेश गोडाने सहायक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, नसरीम ताबोळी, प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर, रामदास लोखंडे व समतादूत उपस्थित होते.