Uncategorized

“बनावट सोन्याचे बिस्कीट / चिप / सोन्याची वंडणी दाखवून वृध्द महिलांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक, १० गुन्हे उघडकीस, साडे बारा लाख रुपयांचा माल हस्तगत – हडपसर पोलीसांची दमदार कारवाई “

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत जुन २०२१ ते फेबुवारी २०२३ या दोन वर्षांचे काळामध्ये हडपसर गाडीतळ बसस्टॉप परिसरातून प्रवासातील ज्येष्ठ नागरिक महिलांना हेरून त्यांना दिसेल असे सोन्याचे बिस्कीट / विप/सोन्याची जाड चढणी टाकून प्रवासी महिलेने तो बनावट दागिना घेताच आरोपी त्या महिलेस आंम्ही देखील तो दागिना पाहीला आहे. आपण आपसात वाटून घेऊ असे आमिष दाखवीत. सोन्याचे बिस्कीट / चिप/जाड वेढणी तोडता येणार नसल्याने तुमच्या अंगावरचं सोन्याचे दागिने मला द्या असे सांगत, वृद्ध महिलेस स्वतःचे अंगावरच्या दीक्षा प्रवासात सापडलेले दागिने हे जास्त वजनाचे व किंमतीचे असल्याने स्वतःजवळील सोन्याच्या बदल्यात जास्त किंमतीचे सोने मिळते या आरोपींच्या भुलथापांना बळी पडत असत. अशी ७ गुन्हे हडपसर पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. तसेच पुणे शहरात भारती विद्यापीठ २ गुन्हे आणि मांसरी गुन्हा असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्याच्या तपासात अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सहा. पो. निरी विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरी. अविनाश शिंदे आणि तपासपथक अंमलदार यांनी तपासाबाबत नियोजन केले. हडपसर तपास पथकाने हडपसर गाडीतळ ते गांधी चौक व परत रस्त्याची दुसरी बाजु गांधी चौक ते गाडीतळ अशा भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी संख्या ४ ते ५ प्रवासात अंगावर दागीने असलेली एकटी वृद्ध महीला शोधीत सर्व आरोपींची वेशभुषा / देहबोली ग्रामीण होती. घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी तपास करून गुन्ह्यातील आरोपी हे बीड जिल्ह्यातील असलेबाबत माहिती मिळाली. आरोपी बीड येथून पुणे शहर, चाकण, जेजुरी येथे ४ ते ५ दिवस मुक्काम करीत व गुन्हा करून परत बीड येथे जात असत.

हडपसर पोलीस स्टेशन पो.उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोना समीर पांडुळे, निखील पवार, भगवान हंबई यांचे एक बीडला पाठविण्यात आले. त्यांनी गुन्हयातील आरोपींचे वाहनाचा प्रकार व बनावट नंबर प्राप्त करून आरोपी पुणे येथे गुन्हा करणेसाठी जात असल्याचे महत्वाची माहीती प्राप्त केली. प्राप्त माहीती वरुन हडपसर पोलीस स्टेशनकडील दुस-या पथकाचे सपनि विजयकुमार शिंदे, पोशि प्रशांत टोगो, अतुल पंधरकर, अनिरुद्ध सेनवणे, मनोज सुरवसे, अमोल दणके यांना आरोपीची स्विफ्ट गाडीसह आरोपी नामे १) गणेश विनायक गायकवाड वय ३२ वर्षे रा.मु.पो. भालगाव मारुती मंदिराच्या जब ता. पाथर्डी जि.अहमदनगर २) रमेश विनायक गायकवाड (वय. ३० वर्ष रा. मु.पो. भालगाव मारुती मंदिराजवळ, ता. पाथर्डी जि.अहमदनगर ३) लक्ष्मण जाधव (वय ४२ वर्ष रा. मु.पो. नाळवंडी नाका, गांधीनगर ता. बीड जि. बीड.) ४) हरिभाऊ मोहन कासुले (३५ वर्षे रा. मु.पो. भालगाव काळे वस्ती, ता. पाथर्डी जि.अहमदनगर )यांना विश्रांतवाडी येथून ताब्यात घेतले. आरोपींनी हडपसर गाडीतळ, कात्रज बस डेपो, भोसरी बस डेपो, चाकण बस डेपो या ठिकाणी मागील दोन वर्षापासून वेळोवेळी येवून गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीना हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १३१३/२०२२ भा.दं.वि. कलम ४२०,३४ या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे त्यांचा साथीदार ५) महादेव आसाराम जाधव (वय ५० वर्षे, रा. मु. पिट्टी पो. निरगुडी, ता. पाटोदा जिबिड यास बिड )येथून ताब्यात घेवून त उवा करण्यात आली आहे.

आरोपींनी दोन वर्षांचे कालावधीत केलेल्या एकूण २४ पेक्षा अधिक घटनांची माहीती दिली असून त्यापैकी हडपसर पोलीस ठाणे येथील ०७ गुन्हे, भारती विध्यापीठ पोलीस ठाणे येथील ०२ गुन्हे भोसरी पोलीस ठाणे येथील ०१ गुन्हा असे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांचेकडून १२८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने गुन्हयात वापरलेली स्विफ्ट कार मोबाईल हॅन्डसेट असा सर्व मिळून कि.स. १२,४४,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीची दिनांक 1 २३/०३/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी नामे गणेश विनायक गायकवाड (वय ३२ वर्ष रा. मु.पा. भालगाव, मारुती मंदिराच्या जवळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा जिल्हा अहमदनगर येथील संगमनेर पोलीस ठाणे येथील गुन्हा क्र १४६ / २०१६ भादवी कलम ४२०, ३४ मध्ये मागील ०७ वर्षापासून पाहीजे आरोपी आहे. तसेच जालना जिल्हा आंबड पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रं ४६ / २०२० भादवी कलम ४२०,३४ मध्ये मागील ०३ वर्षापासून पाहीजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सों पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सगो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुले सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सी, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, रशिद शेख, कुंडलीक केसकर, मनोज सुरवसे, अमोल दणके यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.