पुणे

राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी अशोक आव्हाळे

राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या हवेली तालुका अध्यक्षपदी अशोक आव्हाळे यांची निवड करण्यात आली. मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे अध्यक्ष बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या प्रमुख उपस्थित अशोक आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आव्हाळे यांना हवेली तालुका अध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले. आव्हाळे गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अशोक आव्हाळे २००७ साली हवेली तालुका ग्राहक समितीच्या अध्यक्षपदी काम करत होते. पुन्हा एकदा आव्हाळे यांना त्यांच्या कामाची पद्धत पाहून प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर दिली आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बसवराज पाटील, घनश्याम शेलार, ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबईचे अध्यक्ष विजय देसाई, प्रवक्ते महेश चव्हाण, अनिता गवळी, लक्ष्मण चव्हाण इत्यादी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मांजरी खुर्द विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हा चेअरमन, हवेली तालुका पीठ गिरणी संघटनेचे तालुकाध्यक्ष, हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे माजी उपाध्यक्ष, यशवंत ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच साई गणेश ना. सह. पतसंस्थेचे उपाध्यक्ष व साप्ताहिक ज्ञानलिला या साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून ते आज कार्यरत आहेत. कोरोनाच्या माहामारीमध्ये आव्हाळे यांनी डॉक्टर, पोलीस, ग्रामस्थ या सर्वांना सहकार्य करून कोरोना पीडित लोकांना “ॠणानुबंध माणुसकीचे “या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली.या निमित्त “कोरोना योध्दा ” पुरस्काराने आव्हाळे यांना अनेक ठिकाणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना तालुका अध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.