पुणेमहाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल चोराला २४ तासाच्या आत लोणी काळभोर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत गु र नं ४१६ / २०२३ भादवि कलम ४५४.३८०, ४२७ मधील फिर्यादी नामे सौ. डॉ. किरण सुहास शिंदे, (वय ३७ वर्षे, व्यवसाय- डॉक्टर रा. फ्लॅट नं १४ विंग सी/१, स्वरगंधा सोसायटी, तिसरा मजला, उरुळीकांचन ता. हवेली, जि. पुणे) यांच्या राहत्या फ्लॅटची कडी व कोयंडा तोडुन आत प्रवेश करून सोन्याचे दागीणे व रोख रक्कम असा किंमती मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन चोरी करुन नेला. म्हणुन लोणी काळभोर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद आहे. सदर आरोपीतांचा शोध घेणेकामी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, दत्तात्रय चव्हाण यांनी पोउपनि गोरे व तपास पथकातील अंमलदारांना आदेशीत केल्याने त्या अनुशंगाने पोउपनिरी गोरे यांनी तपास पथकाचे साहयाने उरुळी कांचन ते हडपसर असे सुमारे २५० सी सी टी व्ही फुटेज चेक करुन, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदाराचे आधारे अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता तपास पथकातील पो. हवा. नितीन गायकवाड, पो.ना श्रीनाथ जाधव व पोशि शैलेश कुदळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “एक दिवसापुर्वी उरुळी कांचन येथील बंद घरातुन चोरी करणारा इसम हा कवडीपाट टोलनाका, पुणे या ठिकाणी असुन त्याने अंगात निळ्या रंगाचा हाफ भायाचा टि शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. सदरची माहिती पो. हवा. गायकवाड यांनी आम्हास कळविताच आम्ही ती ताबडतोब वपोनि श्री दत्तात्रय चव्हाण सो यांना कळविली असता त्यांनी सापळा रचुन सदर संशयीत इसमास ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केल्याने त्या प्रमाणे आम्ही वरील प्रमाणे स्टाफ घेवुन कवडीपाट टोलनाका येथे गेलो असता बातमीदाराने सांगीतले प्रमाणे वरील वर्णनाचा इसम आम्हास कवडीपाट टोलनाका येथे रस्त्याचे कडेला कोणाची तरी वाट पाहत असलेला दिसला आमची चाहुल लागताच तो सदर ठिकाणावरुन पळुन जावु लागल्याने त्याचा पाठलाग करुन थोडयाशा अंतरावर त्यास शिताफीने ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आणुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव राजकुमार ओकांरआप्पा वय २८ वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. होम मेट सोसायटी आपुलकी बार समोर महादेवनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं. ४१६ / २०२३ भादवि कलम ४५४, ३८०, ४२७ या गुन्ह्यात अटक करण्यात आल अटके दरम्यान त्याचेकडे केले तपासात त्याने सदर गुन्ह्या व्यतिरीक्त खालील गुन्ह केल्याचे उघडकीस आले असुन सर्व गुन्हयामधील चोरीस गेले एकुण ४,९७,००० रुपयांचे सोन्याचे दागिणे त्याचेकडुन जप्त करण्यात आले आहेत.

तसेच त्याने या गुन्हया व्यतिरीक्त पुणे शहर, पिंपरी चिंचवड, व पुणे जिल्हा परिसरात आणखी १० ते १२ घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे सांगत असुन त्या दृष्टीने अधिक तपास चालू आहे. त्याचेकडुन सध्या उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे

१) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं. ४१६/ २०२३, भा.द.वि कलम ३८०, ४५४,४२७ २) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं. ३६८/२०२३, भा.द.वि कलम ३८०, ४५४ ३) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं. ३५२ / २०२३, भा.द.वि कलम ३८०, ४५४

४) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं. ३४० / २०२३, भा.द.वि. कलम ३८०, ४५४, ४५७

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा.श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, मा. अश्विनी राख सहा. पोलीस आयुक्त सो हडपसर विभाग, मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, मा. सुभाष काळे पोलीस निरीक्षक सो, (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे, पो. हवा ३८७१ सातपुते, पो. हवा पोहवा / ४३२ गायकवाड, पो.हवा २८९७ सायकर, पो. हवा / २४३४ बोरावके, पो ना / ७६९५ जाघव, पोना / ७३३५ नागलोत, पोशि/ १२००५ शिरगीरे, पो शि/ ४७११ कुदळे, पोशि/ ३२९ वीर पोशि/ ९८८६ सोनवणे, मपोशि विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.