पुणे

उरुळी कांचन बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई व्हावी – आढळराव पाटील यांची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी

उरुळी कांचन या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक  टाकून व आई-वडिलांना‌ मारून टाकण्याच्या भीती दाखवून जो बलात्कार झाला,

यासंदर्भात शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी तिच्या घरी जाऊन कुटुंबांचे सांत्वन केले,

तसेच मी व माझा शिवसेना परिवार हा पूर्णपणे तुमच्या पाठीशी असेल हे असे आश्वासन दिले,

यानंतर पोलीस स्टेशनला भेट घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेटून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे अशी सूचना देऊन अशा घटना घडू नये

यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकांनी सतर्क राहावे व अशा घटना परत समाजात घडू नये यासाठी माझा शिवसैनिक शक्य तेवढा प्रयत्न नक्कीच करेल व यासंदर्भामध्ये माझं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सुद्धा बोलणं झालं असून आरोपींना कठोर कारवाई करण्याविषयी चर्चा झाली आहे असं मनोगत खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, जिल्हा संघटक निलेश काळभोर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, महिला आघाडी संघटिका धनश्री मस्के, विभाग प्रमुख सागर फरतडे, वैद्यकीय विभाग प्रमुख अभिषेक पवार, समीर शितोळे , श्रीकांत सोनवणे, उप तालुका प्रमुख दीपक लोणारी, यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते