पुणे

“संकल्प विजयाचा महायुती सरकारचा ! आढळराव पाटील यांच्या प्रचार नियोजनासाठी लांडेवाडीत बैठक

पुणे (स्वप्निल कदम)

लांडेवाडी येथील, शिवनेरी निवासस्थानात महायुतीच्या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांसह नियोजन बैठक आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, भा. ज. पा. व शिवसेनेचे समस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुनः एकदा पंतप्रधान बनवण्याचे ध्येय समस्त कार्यकर्त्यांनी, आपल्या उराशी बाळगले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित बैठक मोठ्या उत्साहात पार पडली व समस्त कार्यकर्त्यांच्या सकारात्मक ऊर्जेसह पुढील वाटचाल थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी असणार आहे अशी मला खात्री आहे.

 

आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्याचा संकल्प…
शिरूर लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षे खासदार असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम उत्तम होते पुन्हा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनाच खासदार म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.