Uncategorized

“स्व.संदीप जगदाळे यांच्या स्मरणार्थ कोरेगाव दिव्यांग शाळेत लेखणीक विद्यार्थ्यांचा सत्कार, हडपसर मधील डॉक्टरांचा अनोखा उपक्रम..

सिध्देश्वर महिला बहुद्देशीय संस्था व आबणे हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.संदिप जगदाळे (पत्रकार) यांच्या स्मरणार्थ
कोरेगाव पार्क येथील अंधशाळेतील 10च्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी परीक्षेसाठी लेखणीक (राईटर) म्हणून मदत करणारा विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय साहित्य व रोख रक्कम देवून करण्यात आला.
अंधशाळेतील मुलांना दप्तर वाटप करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, निवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, उद्योजक राहूल तुपे, हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शंतनु जगदाळे, माजी अध्यक्ष मंगेश वाघ, डॉ.प्रशांत चौधरी, डॉ.मंगेश बोराटे, डॉ.मनोज कुंभार, प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे , प्रविण भांगे उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत खरात, डॉ.राहूल झांजुर्णे , यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ.शंतनु जगदाळे व डॉ.सचिन आबणे यांनी केले.