परभणीपालघरपिंपरी-चिंचवडपुणेपुणे शहरबारामतीबीडबुलडाणाभंडाराभोरमावळ

मुंबईत होणार “हेअर अँड ब्युटी” चा भव्य सेमिनार यशवंत नाट्यगृह इथे होणारा सेमिनार पाहण्याची सलून व्यावसायिकांना मिळणार संधी

मुंबई / प्रतिनीधी: ( विलास गुरव) येथील यशवंत नाट्यगृह इथे “हेअर अँड ब्युटी” चा भव्य सेमिनार होणार असून १० फेब्रुवारी २०२५ होणाऱ्या “हेअर अँड ब्युटी” सेमिनार पाहण्याची संधी मुंबईसह महाराष्ट्रातील सलून व्यावसायिकांना मिळणार आहे.

यामध्ये एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये विविध गोष्टी विजेत्यांना मिळणार आहेत. इथे आलेल्या प्रत्येक सलून व्यावसायिकाला सलून उपयोगी वस्तू गिफ्ट म्हणून मिळणार आहेत. त्या तिकिटाची पहिली प्रत सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी ठेवण्यात आली त्या प्रसंगी सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचे संस्थापक श्री.दत्तात्रय चव्हाण, महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद चव्हाण, उपाध्यक्ष बंधू चव्हाण, सेक्रेटरी किसनराव कोराळे, खजिनदार सतीश पवार, सचिव मंदार राऊत, कार्याध्यक्ष निलेश रणदिवे, प्रभारी उदय टक्के, माजी अध्यक्ष दीपक यादव, मुंबई उपाध्यक्ष संदीप बद्रिके, जितेंद्र चव्हाण, सेक्रेटरी सचिन टक्के, खजिनदार अनिल पवार, मालाड शाखाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, ठाणे अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष संदीप जाधव उपस्थित होते.

दहा फेब्रुवारी ला होणाऱ्या या सेमिनारसाठी हेअर आणि ब्युटी क्षेत्रातील नामांकित मंडळी उपस्थित राहणार आहेत. सलून व्यवसायातील बऱ्याच नव नवीन गोष्टी पाहण्याची ही संधी आहे. महिलांसाठी एका तिकीटवर असोसिएशनची एका वर्षाची मेंबरशिप फ्री आहे. “लाडकी ब्युटीशियन योजना” तरी सलून व्यवसायिकांनी या सेमिनारला येऊन आपण सलून ब्युटीपार्लर असोशियनचा एक भाग बनाव असे आवाहन मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी केले आहे.