पुणेहडपसर

“संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण विकासाचे काम लवकर सुरू होणार – आमदार योगेश टिळेकर!

संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तीर्थक्षेत्राला राज्य शासनाने नुकताच अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे शंभर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

 

हडपसर गावातील पुरातन संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. संत शिरोमणी सावता महाराज यांचे सतरावे वंशज ह.भ.प सावता महाराज वसेकर यांचे हस्ते संपन्न झाले, विधान परिषदेचे आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी या कामासाठी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला.

 

हडपसर येथील संत सावता महाराज मंदिर हे मुख्य रस्त्यावर असलेले मंदिर या ठिकाणी आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या थांबतात, तसेच सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम देखील येथे दरवर्षी होतो , या कार्यक्रमाच्या प्रसंगाने दोन्ही वेळी पावसाळा सुरू असतो, यामुळे भर पावसात धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती, त्यामुळे येथे सभामंडप व्हावा अशी भाविकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती , सदरील मागणीचा पाठपुरवठा करत आ योगेश आण्णा टिळेकर यांनी पर्यटन विभागातून विविध कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत, हडपसर येथील या सभामंडपासाठी पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला, या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार चेतन तुपे, रूपाली चाकणकर, प्रभू महाराज माळी, माजी महापौर वैशालीताई बनकर माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर माजी नगरसेवक सोपानदादा गोंधळे, योगेश ससाणे फारूख इनामदार, विजय देशमुख, विजयाताई कापरे, वृषालीताई सुनील कामठे, उज्वला जंगले, मारूतीआबा तुपे, वीरसेन बापू जगताप, विजया वाडकर, विकास रासकर, संदीप दळवी, वंदना कोद्रे, उद्योजक दशरथ जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिर ट्रस्ट हडपसर यांच्या वतीने गणेश फुलारे आणि त्यांचे सहकारी यांनी केले.