पुणे

पुण्यातील हडपसर सांस्कृतिक केंद्र होण्याच्या मार्गावर – “डॉ.सदानंद मोरे” यांचे प्रतिपादन ; पदमश्री डॉ.सुदाम काटे यांना “हडपसरभूषण” पुरस्कार प्रदान

हडपसर/पुणे – (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
” पुण्याचे आता आणखी एक पुणे होऊ लागले असून,या नव्या पुण्याच्या केंद्र स्थानी हडपसर असणार आहे.महात्मा फुले यांचा सामाजिक वारसा असलेले हडपसर हे आता सांस्कृतिक केंद्र होण्याच्या मार्गावर आहे” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले.हडपसर साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने ” हडपसर भूषण “व ” हडपसर रत्न ” पुरस्कार डॉ.मोरे यांचे हस्ते रोख रक्कम, शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी हडपसर भूषण पुरस्कार . पद्मश्री डॉ. सुदाम काटे यांना ,हडपसर समाज रत्न पुरस्कार दशरथ जाधव यांना,हडपसर शिक्षण रत्न पुरस्कार शफी इनामदार यांना तर हडपसर संस्कृती रत्न पुरस्कार चंद्रकांत मगर यांना देण्यात आला.यावेळी प्राचार्य शं. मा. डी गणे, स्वागताधयक्ष शिवाजीराव पवार,मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेथे कर , उपाध्यक्ष भालचंद्र देशपांडे, प्रा. एम.बी. तौर् , प्रा. डॉ.शोभा पाटील ,विजय कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुदा म काटे महणाले ,”दूरदृष्टी असलेल्या डॉ.दादा गुजर यांच्या मुळेच मी पाच शे किलोमीटर वरील खानदेश मधे सिक ल सेल चे कार्य करू शकलो.त्यामुळे हा पुरस्कार साने गुरुजी रुग्णालय व सुमातिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय येथील डॉक्टर्स व वैद्यकीय विद्यार्थी यांचा आहे.हा आजार फक्त आदिवासी भागातील राहिला बसून,शहरातही पोहोचला आहे, त्यामुळे तरुण पिढीने लग्नापूर्वी आता लग्न कुंडली बरोबरच रक्त कुंडली देखील तपासावी ” चंद्रकांत मगर महणाले ” डॉ .सुदा म काटे हे सिकल सेल कार्याचे उद्गाते असून त्यांनी देशाचे वैभव वाढवले आहे. हडपसर परिसरात मानवतावादी व सांस्कृतिक परिस्थिती खूप शोशिक झाली असून, एकत्र येऊन मोठे काम उभा करण्याची गरज आहे ” मानपत्र वाचन वीणा मेथेकर, भालचंद्र देशपांडे, डॉ शोभा पाटील ,विजय कुलकर्णी यांनी केले.प्रास्ताविक सधीर मेथेकर व सुत्रसंचलन माधव उंडे यांनी केले. आभार शिवाजी पवार यांनी मानले.

 

0 0 votes
Article Rating
20 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments