पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
क्या हुआ तेरा वादा असे म्हणण्याची वेळ पुण्यातील भाजप सत्ताधाऱ्यांवर आलेली आहे कारण मोठे वादे करून पुण्याची वाट लावून भ्रष्टाचाराचा आगडोंब पुण्यात उसळला आहे त्यामुळे पुणे देशात मागे पडले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला.
प्रचंड भ्रष्टाचार व मनमानी कारभार या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर बँड वाजून सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते
आंदोलनात रवींद्र माळवदकर, राकेश कामठे, विजय डाखले, संतोष नांगरे, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब बोडके, प्रदीप देशमुख, शिल्पा भोसले, मनोज पाचपुते, गणेश नलावडे, स्वप्निल दुधाने, नितीन कदम, विनायक हनमघर, फहीम शेख, शांतीलाल मिसाळ, विजय खराडे, हेमंत येवलेकर, संतोष बेंद्रे, अजिंक्य पालकर, जनार्दन जगताप शुभम शिंदे विक्रम मोरे बाळासाहेब ढमाळे सुरज सोनवणे, वैभव जाधव, सारिका लोखंडे, विकी वाघे, जावेद इनामदार, नितीन राठोड, अप्पासाहेब जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते
सत्ताधारी भाजप कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार करत आहे, नातेवाईकांना टेंडर देत आहे, स्वच्छतेचा संदेश दिला जातो मात्र पुणे शहर कचऱ्याने भरलेले आहे, महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असून देशात शरमेने पुण्याची मान खाली गेलेली आहे, पुण्याला खड्ड्यात घालण्याचं काम या भाजप सत्ताधाऱ्यांनी केल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे कामगारांचे उपोषण सुरू आहे पुण्याची अधोगती भाजप सत्ताधाऱ्यांमुळे झाली आहे असा आरोप देखील यावेळी बोलताना चेतन तुपे यांनी केला.
