कोरोनाचा धोका संपला असं वाटत असतानाच आता पुन्हा टेन्शन वाढलंय!
Centers for Disease Control and Prevention च्या अहवालानुसार कोरोनाचा नवा “सुपर व्हेरिएंट” BA.3.2 समोर आला आहे.
हा व्हेरिएंट ओमायक्रॉनचाच एक प्रकार असून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळला होता.
आता तो अनेक देशांमध्ये पसरला असून तब्बल 25 राज्यांमध्ये रुग्ण सापडले आहेत.
सर्वात धक्कादायक म्हणजे हा व्हेरिएंट विमानतळावरील सांडपाण्यातही आढळला आहे!
शास्त्रज्ञ सांगतात की, या व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 70 ते 75 बदल झाले आहेत, ज्यामुळे तो अधिक वेगाने पसरू शकतो.
पण दिलासादायक बाब म्हणजे —
हा व्हेरिएंट सध्या तरी जास्त गंभीर नाही. रुग्ण उपचारानंतर बरे होत आहेत.
तरीही सावध राहणं गरजेचं आहे!
कारण कोविड पूर्णपणे गेलेला नाही आणि नवीन व्हेरिएंट तयार होतच राहणार.
👉 मास्क, स्वच्छता आणि काळजी — अजूनही तितकीच महत्त्वाची!
