घरगुती गॅस वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य करत सांगितलं आहे की, ज्या भागात पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG उपलब्ध आहे, तिथे भविष्यात LPG बंद होण्याची शक्यता आहे.भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकार PNG चा वापर वाढवण्यावर भर देत आहे.
ज्या नागरिकांना PNG कनेक्शन उपलब्ध आहे, त्यांनी त्वरित अर्ज करून कनेक्शन घ्यावं, कारण पुढील काही महिन्यांत LPG टप्प्याटप्प्याने बंद होऊ शकतो.
या संदर्भात केंद्र सरकारची महत्त्वाची बैठकही पार पडली आहे.या बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.भुजबळ यांनी सांगितलं की, PNG हा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय असल्यामुळे सरकार त्याचा प्रसार करत आहे.
म्हणूनच, ज्या भागात PNG सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी विलंब न करता कनेक्शन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
