पुणे

“दुनिया झुकती है…” म्हणत महिलांचे शोषण! अशोक खरातची SIT समोर धक्कादायक कबुली

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत.
SIT चौकशीत खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
चमत्कार, वशीकरण आणि देवभक्तीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो हातचलाखी आणि मानसिक दबावाचा वापर करत होता.
“दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए” असे म्हणत लोकांचा विश्वास जिंकून त्यांचा गैरफायदा घेतल्याचेही उघड झाले आहे.

महिलांना भीती दाखवणे, देवाचा कोप होईल असे सांगणे, आणि स्वतःला चमत्कारीक शक्ती असल्याचे भासवणे—या सगळ्या युक्त्या वापरून तो शोषण करत होता.
दरम्यान, SIT आता खरातच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहे. त्याची मुलगी तृप्तीबाला हिच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे.
आर्थिक गैरव्यवहार आणि इतर कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.