पुणे

“पार्थ पवारांची टीका!काँग्रेसचा जोरदार टोला!”

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे.
पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका करत “महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे” असं वक्तव्य केलं… आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं.
यावर महाराष्ट्र काँग्रेस ने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“कुटुंबाच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अतीच झालं,” असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

तसंच, वडिलांच्या मृत्यू प्रकरणावर आणि जमीन व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने पार्थ पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसकडे पाठिंब्याची विनंती केली होती… मात्र काँग्रेसने बारामतीत उमेदवार उतरवल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.
पार्थ पवार यांनीही इशारा देत “काँग्रेसला पुढे महाराष्ट्रात काय त्रास होईल, ते दिसेल” असं म्हटलं आहे.
आता या राजकीय संघर्षात पुढे कोण वरचढ ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.